पिकअप - मोटारसायकल अपघातात महिला जागीच ठार

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : तेलवाडी गावाजवळ पिकअप व मोटारसायकल अपघातात मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाली. या महिलेला ४ महिन्यांची मुलगी आहे. हा अपघात दुपारी ४ वाजता झाला. तेलवाडी येथील रहिवासी संदीप गोटिराम चव्हाण (२५) व निकिता संदीप चव्हाण (२१) हे दोघे मोटर सायकलने (एमएच २० - ६५५६) तेलवाडीहून  कन्नडकडे येत होते.

चाळीसगावहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या केळीने भरलेल्या पिकअपने मोटरसायकलला मागून जोराची धडक दिल्याने मोटर सायकलवर स्वार असलेली निकिता चव्हाण ही जागीच ठार झाली. तर पती संदीप गोटीराम चव्हाण किरकोळ जखमी झाला. हा अपघात झाल्यानंतर  
उलटला. तेलवाडी ग्रामस्थ व शहर पोलिस स्टेशनचे बीट जमादार संजय आटोळे हे सहकाऱ्यांसह मदतीस धावले. त्यांनी संदीप चव्हाण व निकीता चव्हाण या पती पत्नीला शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. पठारे यांनी तपासून निकिता संदीप चव्हाण हिस मृत घोषित केले.
 पती संदीप चव्हाण किरकोळ जखमी असल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निकिता चव्हाणच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी डॉ. पठारे यांनी केली. संदीप व निकिता यांचा विवाह २ वर्षापूर्वीच झाला. निकिताला ४ महिन्याची मुलगी आहे. अपघातग्रस्त पिकअप चालक स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर झाला.